Akola Thackeray Group Morcha : शेतकऱ्यांसाठी अकोल्यात ठाकरे गटाचा 'रुमणे मोर्चा'
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाचा रुमणे मोर्चाला सुरूवात... शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे रुमणे मोर्चा काढण्यात येतोय. सिंचनाचा प्रश्न,. पीकविमा कंपन्यांचा कारभार, पश्चिम विदर्भावरचा अन्याय अशा विविध मुद्द्यांवरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे... खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.. आधी पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, मात्र काल उशीरा १८ अटींसह या मोर्चाला अखेर परवानगी देण्यात आलेय.