Akola Students: अकोल्यात एकाच कॉलेजमधील चार विद्यार्थी बेपत्ता, 1 तरुणी 3 तरुण 6 दिवसांपासून बेपत्ता
Continues below advertisement
अकोल्यात एकाच कॉलेजमध्ये शिकणारे चार विद्यार्थी बेपत्ता झालेत. तीन तरुण आणि एक तरुणी गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता झालेत. १ ऑगस्टला हे विद्यार्थी कॉलेजला गेले, मात्र तेव्हापासून ते परतलेतच नाहीत... चौघेही अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा इथल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकतायत. बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द इथल्या तरुणाचाही समावेश आहे.
Continues below advertisement