Akola : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट आणि दुचाकींवर अकोला पोलिसांची कारवाई,सायलेन्सरचा चुराडा
रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करत बुलेट आणि दुचाकींवर अकोला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. अकोला शहरात तब्बल एक हजार २०६ गाड्यांवर ही कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी अशा दुचाकींच्या सायलेन्सरचा रोडरोलरने चुराडा केलाय. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.