Akola News : कडाक्याच्या थंडीतही शाळा सकाळी भरवण्याचे आदेश
अकोल्यात गेल्या आठवडाभरात पारा चांगलाच खाली उतरलाय. अशातच अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सलग तीन दिवस शाळा सकाळी घेण्याचे आदेश दिलेत. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवानिमित्त शिक्षकांच्या उपस्थितीसाठी थेट विद्यार्थ्यांनाच वेठीस धरल्याचा प्रकार समोर आलाय... पारा 13 ते 10 अंश असतांना प्राथमिक शिक्षण विभागानं हा निर्णय घेतल्याने पालक संताप व्यक्त करतायत...