Akola Earthquake : अकोल्यात ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के ABP Majha
अकोल्यात काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले... ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. तीव्रता कमी असल्यानं सुदैवानं या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिलेय... अकोल्यापासून २१ किमी अंतरावर या भूकंपाचं केंद्र होतं अशी माहितीही आता समोर येतेय.