Akola Crop Insurances : अकोल्यात पीकविमा कंपनीविरोधात ठाकरे गट आक्रमक, तिसरं दुकान फोडलं
अकोल्यात दिवसभरात पिकविमा कंपनीचं दुसरं कार्यालय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. पातूर शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय शिवसेनेनं फोडलं. सकाळी कौलखेड भागातील रिंगरोडवरील एचडीएफसी इर्गो कंपनीचं कार्यालय फोडलं होतं. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर पिकविम्याच्या मुद्द्यावर बसलेत आमरण उपोषणाला. दोन वर्षाचा थकीत पिकविमा आणि अतिवृष्टीमूळे झालेल्या नुकसानाची मदत त्वरीत देण्यासाठी दातकर यांचं उपोषण. मात्र, शासन दखल घेत नसल्यानं केली शिवसैनिकांनी तोडफोड.