Akola Bomb Threatening : BJP MP Sanjay Dhotre आणि पूर्णा एक्सप्रेसला बॉम्बनं उडवण्याची धमकी
अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रेंचं घर आणि अकोला-पुर्णा पॅसेंजर रेल्वे उडविण्याचं धमकीनं अकोला पोलिांची रात्री चांगलीच झोप उडालीय. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात काल यासंदर्भात एक निनावी फोन गेला होताय. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अकोला पोलिसांना माहीती दिलीय. यानंतर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास अकोला पोलिसांची चांगलीच धावपळ उडालीय. अकोला पोलीस, रेल्वे पोलिसांनी काल रात्रीच अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या पुर्णा पॅसेंजरची कसून तपासणी केलीय. यासोबतच खासदार संजय धोत्रेंच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय. संपुर्ण तपासणीनंतर मथ्यरात्री पुर्णा पॅसेंजर नांदेडकडे रवाना करण्यात आलीय. दरम्यान, हा फेक कॉल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीये. हा फोन मुंबई नियंत्रण कक्षाला ठाणे येथून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. हा फोन करणारा करणारा तरूण अकोल्यातील उमरी भागातील असून तो सध्या मुंबईत राहतोय. तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तो सध्या पोलिसांच्या हाती लागला नसून अकोला पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांना पाचारण केल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.