Akola : कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शेतकरी भडकला
Akola : कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शेतकरी भडकला अकोल्यात देवेंद्र फडणवीस कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी भाषणात भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी या सरकारनं शेतकर्यांना सरसकट 50 हजार रूपये दिल्याचं म्हटलं. यानंतर उपस्थितांमधून एक शेतकरी उठून उभा राहिला. आपल्यासह अनेकांना हा लाभ मिळाला नसल्याचा दावा केला. काही भाजप कार्यकर्त्यांनी त्याला शिवीगाळ करीत खाली बसवलं. या शेतकऱ्यांचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या भाषणातही केला. कार्यक्रम झाल्यानंतर या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रामू दामोदर केंद्रे असं या शेतकर्यांचे नाव आहेय. तो वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातल्या केळी गावाचा रहिवाशी आहे. या शेतकर्यावर काहीच कारवाई करू नये यासाठी पोलीस अधिक्षकांना विनंती करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय.