Akola : पीकविमा कंपन्यांविरोधात कृषी विभाग ॲक्शन 'मोड'वर, ICICI लोंबार्डच्या अधिकाऱ्यांवर कारवाई

अकोल्यात पीकविमा कंपन्यांविरोधात कृषी विभाग ॲक्शन 'मोड'वर. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचं कमी नुकसान दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या 'आयआयसीआय लोंबार्ड' विमा कंपनीच्या 10 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर 21 मार्चला गुन्हे दाखल करण्यात आलेत. ज्यामध्ये 'आयसीआयसीआय कंपनी'च्या जिल्हा व्यवस्थापक आणि सातही तालूका व्यवस्थापकांवर शहरातील खदान पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कंपनीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 रूपयांनी फसवणूक केल्याचं समोर आलं.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola