Maharashtra : राज्यात खरीप तुरीचा हंगाम धोक्यात येणार , तुरीवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव
राज्यात खरीप तुरीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. याला कारण आहे सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख हेक्टरवरील तुरीचे पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळे सध्या बाधित झालेलं आहे. मात्र याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून पिकाचं कसं संरक्षण करावं यासाठी कृषी सल्ला दिला आहे.