Amol Mitkari : राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या कुटासा ग्रामपंचयतीचे 12 सदस्य अपात्र,अमोल मिटकरींना धक्का

Continues below advertisement

अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या अकोल्यातील कुटासा गावात धक्का बसलाय. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कुटासा ग्रामपंचायतीचे १२ सदस्य अपात्र ठरवण्यात आलेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा आदेश दिलाय. १५ लाख रुपये किमतीची इमारत बेकायदा पाडल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सरपंचांसह १२ सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादीचे १० सदस्य आहेत. जिल्हा परिषद, सहकारी सोसायटीतील पराभवानंतर अमोल मिटकरी यांना त्यांच्या गावात हा तिसरा धक्का आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram