Ajit Pawar taunts whol left NCP | राष्ट्रवादीला सोडणाऱ्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल, एक मायचा लाल थांबला नाही, अशी लोकं नको
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन 2022 हाती घेतलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक 8 वरुन 60 झाले पाहिजेत, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत.