Ajit Pawar Konkan Tour : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा, चिपी विमानतळावर आगमन : ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा घेणार आढावा घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील कोव्हिडं 19  विषाणू प्रादुर्भाव आणि उपाय योजनांचा आढावा, चक्रीवादळ तसेच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, मदत, पुनर्वसनाचा देखील आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभागृहात होत आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार विषेश विमानाने बारामतीहून सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. अजित पवार यांचा सिंधुदुर्गात पहीलाचं दौरा असून या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा घेणार आढावा तसेच जिल्ह्यातील कोव्हिडं 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा व चक्रीवादळ  तसेच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा आढावा घेणार आहेत. त्या नंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यासह शरद कृषी भवन येथे बैठक घेणार आहेत. त्यांनतर संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलाचं दौरा असून ते या दौऱ्यात सिंधुदुर्ग वासियासाठी काय घोषणा करणार या कडे लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram