Shirdi Temple : मंदिराच्या छतावर असणारा लोखंडी साहित्याची अडगळ प्रशासनाने हटवला
शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोझा काल हटविण्यात आलाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी वातानुकूलित यंत्रणेचे साहित्य मंदिराच्या छतावर बसविण्यात आले होते. तसच साडेपाच टनांचे आऊट डोअर आणि इतर साहित्य होते. मात्र या बोझामुळे जुने झालेल्या मंदिराला धोका होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायात यांनी आदेश दिल्यानंतर हे सर्व साहित्य अन्य ठिकाणी हलवण्यात आलं आहे.. तसच या साहित्यासह छतावर असणारे शेकडो किलो वजनाचे साहित्य हटविण्यात आल्यामुळं मंदिराच्या छतानं अता मोकळा श्वास घेतला आहे...