Shirdi Kopergaon Water Issue : शेतीला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा गोदावरी कालव्याच्या गेटजवळ ठिय्या

नगरमध्ये कोपरगाव तालुक्यासह अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय..ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे,, तर कोपरगावमधील गोदावरी कालव्यातून पाणी वाहून जात आहे मात्र शेतीला पाणी मिळत नाही त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.. शेतीला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदावरी डाव्या कालव्याच्या गेट जवळ ठिय्या मांडल.. तसंच पाटबंधारे विभागाने शेतीला पाणी सोडले नाही तर कुलूप तोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola