Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास

Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याआधी त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी निलेश लंके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.जनतेला सांगण्यासाठी विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे विरोधक आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत... अहमदनगर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा अर्ज भरण्याआधी झालेल्या जाहीर सभेत  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हनुमान जयंती दिवशी  लंकेचे दहन करा असे भाषणामध्ये बोलताना मतदारांना सांगितले होते मात्र निलेश लंके  हे निवडणुकीला उभे राहिले असल्यामुळे विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते आमच्यावर टीका करत असल्याचे राणी लंके यांनी म्हंटले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola