Ahmednagar मध्ये दोन गटात तुफान दगडफेक , पोलिसांचा कडक बंदोबस्त : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Apr 2023 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या गजराजनगर परिसरात वारूळवाडी रोडवर मंगळवारी रात्री तुफान दगडफेक झाली.. यावेळी समाजकंटकांनी दोन मोटरसायकल जाळत, स्विफ्ट कारची तोडफोड केली. या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय...घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली... दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत... ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली हे मात्र समजू शकलेलं नाही... शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी गजराज नगर परिसरात आणि मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.