Ahmednagar : कोपरगावचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं वृद्धापकाळानं निधन
Continues below advertisement
अहमदनगरच्या कोपरगावचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंकरराव कोल्हे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रात मोठं योगदान असलेलं आणि पाणी प्रश्नी आग्रही भूमिका घेणारं नेतृत्त्व हरपलं आहे. सहा दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याची उभारणी केली. महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क अशा खात्याचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलं. शंकरराव कोल्हे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय होते.
Continues below advertisement