कोपरगावचा बंधारा पुन्हा एकदा फुटला, शेतजमिनीचं नुकसान, दुरुस्तीसाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील मंजूरचा बंधारा पुन्हा एकदा फुटला आहे. दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आणि याच पाण्यात केटी वेअर शेजारी असणारा मातीचा बंधारा वाहून गेला. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला हा बंधारा याअगोदर २०१७ आणि २०१९ मध्ये देखील फुटला होता. त्यामुळं नुकतच या बंधाऱ्याचा काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा हा बंधारा वाहून गेल्यानं त्याच्या कामाविषयी शंका उपस्थिती केली जात आहे.