आपल्याला कोकण पुन्हा उभं करायचंय! 'निसर्गा'च्या प्रकोपानंतर काय आहे कोकणाची आजची परिस्थिती? भाग 1

Continues below advertisement
आंबा-काजू-फणसाची कलमं! निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेली भूमी म्हणजे कोकण, मात्र हाच निसर्ग कोपला आणि कोकणाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. निसर्ग चक्रीवादळानं रत्नागिरी, रायगडमधल्या अनेक गावांमध्ये होत्याचं नव्हतं केलं. अनेकांचे संसार रस्त्यावर आले. कुणी छप्पर गमावलं तर कुणी पोट भरण्याचं साधन, त्यामुळं आता कोकणाला सावरण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कोकण पूर्ववत कसं होणार आणि कोकणाला कशा प्रकारे मदत मिळेल यावर चर्चा करण्यासाठी एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram