Lovestory Crime Ahmednagar : श्रीरामपूरच्या अपहरण झालेल्या तरुणाचा खून, आरोपींकडून कबुली ABP MAJHA

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील भोकर इथून अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं समोर आलंय. अटकेत असलेल्या आरोपींनीच खून केल्याची कबुली दिलीय. दीपक बर्डे असं या तरुणाचं नाव आहे. आदिवासी भिल्ल समाजाच्या दीपकचे मुस्लीम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली. मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर, ३० ऑगस्ट रोजी दीपकने घरच्यांना आपण मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला जात असल्याचं सांगत पुणे गाठले. परंतु पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले, असं दीपकच्या सोबत असलेल्या मित्राने सांगितलं. दीपक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. वडिलांच्या फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांंनी या प्रकरणी सात जणांना अटक केली. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिलीय.. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच दीपक बर्डेच्या शोधासाठी मोर्चा काढला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola