Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha

Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha

नृत्यांगना गौतमी पाटील आज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयत हजर झाली होती. नगरमधील पाईपलाईन रोडवर गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात गौतमीचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप गौतमीवर झाला होता, त्याबाबत सुनावणी सुरू आहे. कोेर्टानं अटी आणि शर्तींसह गौतमीला जामीन मंजूर केला.

गौतमी पाटीलचं खरं नाव काय? (Gautami Patil Real Name)

गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असते. नृत्यांगनेच्या अदा पाहण्यासाठी चाहते घायाळ होतात. गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून नुकत्याच एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत संवाद साधताना तिने तिचं खरं नाव सांगितलं आहे. 

पुण्यातील जुन्नर येथील केवाडी भागात आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलदेखील उपस्थित होती. त्यावेळी गौतमीला भेटण्यासाठी तिची एक चिमुकली चाहतीदेखील उपस्थित होती. दरम्यान आपल्या चाहतीला गौतमीने तिचं नाव विचारलं. चाहतीने आपलं नाव 'वैष्णवी' असल्याचं सांगितलं. त्यावर नृत्यांगना म्हणाली,"माझंदेखील जन्मनाव वैष्णवी आहे". चाहतीसोबत गप्पा मारताना गौतमीने आपलं खरं नाव जगजाहीर केलं आहे. आता वैष्णवी या नावामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola