Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांकडून लाठीचार्ज
गौतमी पाटीलच्या मागे लागलेली वादाची साडेसाती काही सुटायचं नाव घेत नाहीय. तिचा शो जिथे असतो तिथे कायम वाद हा होतोच. काल अहमदनगर येथे गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान याच कार्यक्रमात काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली.. त्यावेळी या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.गौतमीची लावणी सुरू असताना काही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केली.. त्यामुळे 15 मिनिटं हा शो बंद करण्यात आला. त्यानंतर गर्दी आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु झाला. मात्र तरुणांची हुल्लडबाजी सुरुच राहिल्यानं कार्यक्रम आटोपता घेत मोठ्या बंदोबस्तात गौतमीला तेथून बाहेर काढण्यात आलं.