Devendra Fadnavis speech Shirdi: ज्यांनी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्ष घेऊन मी पुन्हा आलो

Devendra Fadnavis speech Shirdi: ज्यांनी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्ष घेऊन मी पुन्हा आलो शासन आपल्या दारी(shasan apalya dari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मी पुन्हा येईन घोषणेवर भाष्य केलं. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. तसंच, आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला  आहे. ते शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे.  मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola