Ahmednagar Crime : संगमनेरमध्ये खाण चालक आणि स्टोन क्रशर मालकांना कोट्यवधींचा दंड

अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात सध्या एका कारवाईची मोठी चर्चा आहे...  माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मतदारसंघात म्हणजे संगमनेरमध्ये खाण चालक आणि स्टोन क्रशर मालकांना कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आलाय..... ५७ स्टोन क्रशर मालकांना ७६५ कोटींचा दंड आकारण्यात आलाय. परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती आहे.. यासंदर्भात स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत... या कारवाईकडे माजी महसूलमंत्री विरुद्ध विद्यमान महसूलमंत्री अशा दृष्टीनं स्थानिक राजकारणात पाहिलं जातंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola