Panchanama Scam : अतिवृष्टी नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पैशांच्या मागणीचा आरोप
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडीत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी करताना शेतकऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद केली. तर पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलीय.