Ajit Pawar : ज्या घरात वाढलो तेच उद्धवस्त करणं ही बेईमानी, अजित पवार यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.. ज्या घरात वाढलो तेच उद्धवस्त करणं ही बेईमानी आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत अजित पवारांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय.. तसंच राष्ट्रवादी नेत्यांनी लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावा केला असला तरी पुढे आघाडीची वाट पाहत बसू नका असा सल्ला अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा असं अजित पवारांनी शिर्डीतील अधिवेशनात म्हटलंय. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असा सल्लाही अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिलाय..