Ajit Pawar reaction on Original Shivsena : निवडणुका झाल्यावर कळेल खरी शिवसेना कोणती ते : अजित पवार

शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे.वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील.मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनी पाहिलं आहे.ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात.पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असं अजित पवार यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola