Ahmednagar Banner : अहमदनगरमध्ये लावलेले ओबीसीचे बॅनर प्रशासनाने हटवले : ABP Majha

Continues below advertisement

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींच्या आज आणि उद्या ६ सभा होणार आहेत. मोदींच्या आज सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा होणार असून मंगळवारी लातूर, माळशिरस, धाराशिवला सभा होतील.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापुरातल्या होम मैदान इथे दुपारी दीड वाजता जाहीर सभा होणार आहे. तर कराडमध्ये दुपारी साडेतीन वाजता साताऱ्याचे उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा होईल. यानंतर संध्याकाळी सहा वाजता पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी रेस कोर्स इथे मोदींची सभा होईल. या सभेला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरेंसह त्यांचे पुत्र अमित ठाकरेही हजर असतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram