Ahmednagar : तरुणाच्या मृत्यूमुळे यंत्रणा अलर्ट मोडवर, मृत्यू इन्फ्लूएंझामुळे की कोरोनामुळे?

सध्या देशात एच थ्री एन टू या विषाणूचा फैलाव वेगानं होतोय. दरम्यान अहमदनगरमध्ये एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाला इन्फ्लूएंझाची लागण झाली होती...सोबतच त्याला कोरोनाचीही लागण झाली होती..अचानक तब्येत बिघडल्यानं त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराअंतीच या तरुणाचा मृत्यू झालाय...  त्याचा मृत्यू हा इन्फ्लूएंझामुळे झाला की कोरोनामुळे हे तपासणीनंतरच कळणार आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola