Pravara River Boat : नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या SDRF पथकाचीच बोट उलटली

Continues below advertisement

अकोले : उजनी (Ujani) जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत (Pravara River) बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट (SDRF Boat) उलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीत एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध SDRF पथकाकडून सुरु होता. शोधकार्य सुरु असतानाच पथकातील चार जणांसह 1 स्थानिक नागरिक बोट उलटल्याने पाण्यात बुडाले. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही दुर्दैवी घटना घटना घडली आहे. 

एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू 

यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram