Narayan Rane Y security | राज्य सरकारने सुरक्षा काढल्यानंतर केंद्राकडून नारायण राणेंना 'वाय दर्जा'ची सुरक्षा
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकाने राज्यातील अनेक प्रमुखे नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड इत्यादी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र नारायणे राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.