Myanmar : आंग सान स्यू की यांची परवड सुरू ABP MAJHA

Continues below advertisement

म्यानमारमध्ये लोकशाहीवादी सरकार उलथवून टाकत फेब्रुवारी महिन्यात लष्करी राजवट सुरू झाली. आणि आता पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांची परवड सुरू झाली आहे. म्यानमारच्या विशेष न्यायालयानं स्यू की यांना नागरिकांना भडकवल्याच्या आरोपांखाली ४ वर्षांचा कारावास सुनावला आहे. लष्करी राजवट दाखल झाल्यानंतर ७६ वर्षांच्या स्यू की यांना अटक करत त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. आणि या खटल्यांमध्ये स्यू की यांना एकत्रितपणे १०० वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मात्र स्यू की यांना शिक्षा झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांसह देशातूनही निषेधाचा सूर उमटायला सुरुवात झालेय. म्यानमारमधील मानवी हक्क कार्यकर्त्यांनी याची अॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडे तक्रार केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram