'प्यार किया तो डरना क्या?' म्हणत अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण तर जयंत पाटील म्हणतात...
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या वेळी शिवसेना त्यांच्या मदतीला आली आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडे आणि सदर महिलेचे संबंध लपून राहिलेले नाहीत. धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची त्यांनी कबुली दिली आहे. या विषयावर बोलताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी आठवण काढली. प्यार किया तो डरना क्या? असं बाळासाहेब ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले होते, याची आठवण सत्तार यांनी यावेळी करुन दिली.
Tags :
Rape Allegations Renu Sharma Abdul Sattar Chandrakant Patil Kirit Somaiya Dhananjay Munde Jayant Patil Devendra Fadnavis