pakistan Tweet : एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलंय. कारण सर्बियातील पाक दूतावासनं केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेलीय. सर्बियातल्या पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मुलांना स्थानिक शाळेतून घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. कारण मागील अनेक महिन्यांपासून महागाई आणि पाक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही. परिणामी शाळेनं मुलांना घरी पाठवल्यानं आता अधिकारी वर्ग संतापलाय. या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन थेट पाक पंतप्रधान इम्रान खान यांनाच घेरलंय. अशा परिस्थितीतही अधिकारी वर्गानं आणखी किती काळ गप्प राहायचं? असा सवाल इम्रान खान यांना विचारणारं ट्विट खुद्द सर्बियातल्या पाक दूतावासानं केलंय. त्यामुळे आता खोटारड्या आणि बेभरवशाच्या पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola