आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणार

Continues below advertisement
नवी दिल्ली : मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुटी देण्याच्या पर्यायाची चाचपणी केंद्र सरकारकडून सुरू आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. जर 3 दिवस सुटीचा पर्याय स्वीकारला तर संबंधित संस्था कर्मचाऱ्यांना चार दिवस 12 तास काम करणं बंधनकारक असू शकते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram