Uttarakhand Glacier Collapse | तपोवनातील बोगद्यात 35 जण अडकल्याची भीती, बचावासाठी ऑपरेशन सुरू

Continues below advertisement

Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशीमठ जवळ हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 36 लोकांचे शव हाती लागले असून अजून 170 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तपोवन बोगद्यात 35 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांच्या बचावासाठी आता एक ऑपरेशन सुरुवात करण्यात आलं आहे. तपोवनातील हा बोगदा आतापर्यंत 130 मीटरपर्यंत साफ करण्यात आला आहे. जवळपास 180 मीटर अंतरानंतर या बोगद्याला एक वळण आहे. या ठिकाणी लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कारण या ठिकाणी वळण असल्याने पुढे चिखल गेला नसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तपोवणातील हा बोगदा जवळपास साडे तीन किलोमीटर अंतराचा आहे. या बोगद्यात अडकलेल्या 35 लोकांच्या बचावासाठी रात्र दिवस ऑपरेशन सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram