अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, 'आई माझी काळुबाई'च्या सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या माझी आई काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना ही लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
Continues below advertisement