समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट, बुलडाण्यात शेतात जाण्यासाठी तब्बल 10 किलोमीटरचा वळसा

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदु हृदयसमराट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्गामुळे आता जिल्ह्यातिल सिंदखेड़ राजा , मेहकर व देउळगाव राजा तालुक्यातील महामार्गालगत च्या असोला जहांगीर गावातील शेतकऱ्यांना व नागरिकाना एका नव्या संकटाला समोर जाव लागत आहे. महामार्गापलीकडे जवळच असणाऱ्या आपल्या शेतात जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना 10 -10 किलोमीटर लांबच्या रस्त्याने जाव लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत तर काही गावातील नागरिकांना जवळच्या शहरात जाण्यासाठी सुद्धा फेरयाच्या मार्गाने जाव लागत असल्याने आता या गावातील नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram