Covid Vaccination in India | देशात आज दिवसभरात 1 लाख 65,714 जणांचं लसीकरण

Continues below advertisement

आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. कोरोना योद्ध्यांना लस देत ही मोहिम सुरु झाली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तर लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram