नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पालघर पोटनिवडणुकीत आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने केली आहे. आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. शिवाय पालघरचे भाजपचे नवनियुक्त खासदार राजेंद्र गावीत यांनी खर्चाचा तपशीलही जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस शिष्ठमंडळाने केली आहे. काँग्रेसच्या या शिष्टमंडळात सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या लीगल सेलच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
Continues below advertisement