वेलिंग्टन : जॅकिंडा आर्डर्न पदावर असताना प्रसूत होणाऱ्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान
Continues below advertisement
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी नुकतंच गोंडस बाळाला जन्म दिला. पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.
ऑकलंडमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात आर्डर्न यांनी मुलीला जन्म दिला. यावेळी त्यांचे पती आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्डही सोबत होते.
गेल्या वर्षी पदाची सूत्रं हाती घेताना 37 वर्षीय आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या देशाच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं. आता, पदावर असताना प्रसुत होणाऱ्याही त्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.