नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं
वाशी खाडीपुलाच्या जॉईंडर दुरुस्तीचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे. आता 1 फेब्रुवारीपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या वाशी खाडी पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने लोखंडी जॉईंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील जाईंडर दुरूस्तीचं काम उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत हाती घेण्यात येणार होतं.