नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांची एकजूट

Continues below advertisement
छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल्याच्या घटनेला आज 116 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै 1902 रोजी छत्रपती शाहूंनी कोल्हापूर संस्थानात मराठ्यांना आरक्षण जाहीर केलं होतं. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे.. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यांवर उतरत आहे. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात दिल्लीत महाराष्ट्रातील शिवसेना, भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एकत्र आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता या खासदारांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram