Delhi Metro | मेट्रो मॅन 'ई श्रीधरन' यांचा अरविंद केजरीवाल यांच्या योजनेला विरोध | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीतील मेट्रोमध्ये महिलांना फुकट प्रवास देणाच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण, मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे दिल्ली मेट्रोचे माजी प्रमुख ई श्रीधरन यांनी केजरीवालांच्या योजनेला विरोध केलाय. पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून श्रीधरन यांनी केजरीवालांच्या योजनेला मंजुरी देऊ नका, अशी विनंती केलीय. दिल्लीत मेट्रो सुरु केल्यानंतर कुणालाही फुकट प्रवास द्यायचा नाही असं निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे केजरीवाल यांना दिल्लीतील महिलांसाठी मेट्रोचा प्रवास फुकट करायचा असेल, तर त्यांनी महिलांच्या खात्यात पैसे जमा करावे, असं आवाहनही ई श्रीधरन यांनी केलंय.
Continues below advertisement