नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात आज टीडीपी अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत
Continues below advertisement
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. काही पक्ष सोडल्यास, बहुतेक सगळ्याच विरोधी पक्षांनी या ठरावाला समर्थन घोषित केले आहे.
टीडीपी आणि टीडीपीचे कट्टर विरोधी असणाऱ्या वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली आहे.
भाजपवरील विश्वास संपुष्टात आला आहे, त्यामुळे आम्ही अविश्वास ठराव आणत आहोत, असे टीडीपीचे खासदार रविंदर बाबू म्हणाले. तर वायएसआर काँग्रेसचे खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, “संपूर्ण देशाला माहित पडावं की, आंध्र प्रदेशातील लोक कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे आम्ही हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणत आहोत. सर्व विरोधी पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सर्वजण सोबत आहेत. ज्यावेळी आम्ही संसदेत अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडू, त्यावेळी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, एसपी आमच्यासोबत असेल.”
मोदी सरकारविरोधातील या पहिल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला डावे पक्ष आणि काँग्रेसनेही समर्थनाची घोषणा केली आहे.