नवी दिल्ली : सरकारी योजनांसाठी आधार सक्तीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही : सुप्रीम कोर्ट
Continues below advertisement
सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार सक्तीचं करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. मात्र, मोबाईल नंबर आधारला लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता. पण आता ही मुदतवाढ 31 मार्चपर्यंत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Continues below advertisement