नवी दिल्ली :… तर मोदी नव्हे प्रणव मुखर्जी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?

Continues below advertisement
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क अजूनही सुरुच आहेत. आता तर थेट प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी हे भाजपप्रणित एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, असा अंदाज शिवसेनेने व्यक्त केला आहे.


याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळवण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आरएसएस त्या स्थितीसाठी तयारी करत आहे. जर बहुमत मिळण्याची शक्यता कमी वाटली तर संघाकडून प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकतात. भाजप यावेळी कमीत कमी 110 जागा गमावणार हे नक्की”
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram