नवी दिल्ली: मराठा आरक्षणाची चर्चा बंद दाराआड नको, खुली चर्चा करा: संभाजीराजे छत्रपती
बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी ही मिटिंग खुल्या पद्धतीने व्हावी. कुणी एकट्याने जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि चर्चा करावी या मताचा मी नाही नेतेमंडळी काय बोलतात ह्याच्यावरून समाजाच्या भावना ठरत नाहीत. आधीची आंदोलन ज्या पद्धतीने झालेली आहेत त्यामुळे बंद दाराआड चर्चेची भीती वाटते. आमची चर्चेची इच्छा आहे असं म्हणून केवळ चालणार नाही, प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले.