Triple talaq bill in Rajya Sabha | तिहेरी तलाक विधेयकावरुन मोदी सरकारची राज्यसभेत परीक्षा | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभेत तीनदा मंजूर झाल्यानंतर आज पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत सादर करण्यात आलंय. याआधी दोन वेळा लोकसभेत मंजूर झाल्यानंतरही हे विधेयक सरकार राज्यसभेत अल्पमतात असल्य़ामुळे तिथे मंजूर होऊ शकलं नाही. पण, यंदा राज्यसभेतील मतदानाच्या वेळी तिहेरी तलाक विधेयकातील वादग्रस्त तरतुदीचा निषेध करीत काही विरोधक सभात्याग करतील. आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा घ्यायचा, अशी रणनीती सरकारकडून ठरविली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यसभेचा अडथळा पार न करू शकलेल्या तिहेरी तलाक विधेयकाचा मार्ग यावेळी प्रशस्त होण्याची चिन्हे आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram